चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीकडून हत्या!

चिंचवड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने गळा आवळून हत्या केल्याची घटना चिंचवड मध्ये पहाटे पावणेतीन च्या सुमारास घडली. घटनेनंतर आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नकुल भोईर या 40 वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नकुल हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून मुलाचं भवितव्य उघड्यावर आले आहे. नकुल आणि चैताली यांच्यात पहाटे वाद झाले. यातून प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने कापडाने नकुलचा गळा अवळून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती .तेव्हा हा सर्व प्रकार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता. आज ही घटना सकाळी समोर आल्यानंतर पोलिसांनी चैतालीला ताब्यात घेतले आहे .नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता .असं असताना नेहमीच्या वादातून आणि सततच्या चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने पतीची हत्या केली आहे .या घटनेचा तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.
नकुल भोईर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता होता. सामाजिक कार्याची त्याला आवड होती आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने निवडणूक लढवावी यासाठी तो प्रयत्न करत होता .परंतु नकुल भोईर हा पत्नी चैताली च्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले शेवटी वादाचे रूपांतर हत्येमध्ये झाले आहे.

