फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
गुन्हेगारी

पोलीस पथकावर फायरिंग करून फरार झालेला सराईत गुन्हेगार जेरबंद!

पोलीस पथकावर फायरिंग करून फरार झालेला सराईत गुन्हेगार जेरबंद!

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : दिघी पोलीस स्टेशन हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारा व पोलीस पथकावर फायरिंग करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस ताब्यात घेण्यात आले आहे . शेखर संभाजी जाधव (वय 25, रा. मु. पो. मोघा, महादेव मंदिर जवळ ,ता. उदगीर, जि. लातूर) याला जेरबंद केले आहे.

viara vcc
viara vcc

पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 मे 2026 रोजी दिघी पोलीस स्टेशन हद्दीत फायरिंग करून खुनाचा प्रयत्न करणारा आरोपी शेखर संभाजी जाधव व मुस्तफा भाईजान हे रांजणगाव येथे असले बाबत माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेण्याकरिता गुन्हे शाखेचे पोलीस पथक गेले असताना आरोपीने त्यांचा पाठलाग करीत असलेल्या पोलिस पथकावर गोळीबार करून उसाच्या शेताचा फायदा घेऊन पळून गेला होता. त्याबाबत रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद करण्यात आला आहे . 70 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे आरोपी शेखर जाधव यांच्यावर आहेत.

70 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे आरोपी शेखर जाधव यांच्यावर आहेत. सराईत शेखर संभाजी जाधव व अन्य आरोपींच्या शोधाकरिता मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शोध पथकाने तीन वेळा नांदेड, हिंगोली व लातूर जिल्ह्यात जाऊन आरोपी बाबत तपास केला. गोपनीय माहितीच्या आधारे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते पोलीस अंमलदार नितीन उमरजकर हर्षद कदम गणेश सावंत विनोद वीर सोमनाथ मोरे यांनी रविवार 14 जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील मोझे शाळेजवळील मोकळे मैदान येथे सापळा रचून आरोपी शेखर संभाजी जाधव (वय 25, रा. मु. पो. मोघा, महादेव मंदिर जवळ ,ता. उदगीर, जि. लातूर) याला जेरबंद केले. त्याच्याकडे 51 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस राऊंड मिळून आले. आरोपी विरोधात दिघी पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद करून त्यास पुढील तपासाकरिता दिघी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते गोरक्षनाथ बालवडकर पोलीस उपनिरीक्षक महेश खाडे यांच्या पथकाने केली पोलीस पथकावर फायरिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद आरोपीवर 70 पेक्षा जास्त चोरीच्या गुन्ह्याची नोंद

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"