फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
गुन्हेगारी

बेकायदेशीरअफीम अंमली पदार्थाची विक्री करिता वाहतूक; दोघांना अटक

बेकायदेशीरअफीम अंमली पदार्थाची विक्री करिता वाहतूक; दोघांना अटक

चाकण : बेकायदेशीररित्या दोन लाख रुपये किंमतीचा 396 ग्रॅम वजनाचा अफीम हा अंमली पदार्थ विक्री करिता वाहतूक करीत असताना मिळून आला. ही घटना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सावरदरी गावच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, ता. खेड येथे घडली. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी गोविंद देवराम डोके पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मोहन धनाराम जाट (वय 22, रा. लिक्विऊ चौक, सावरदरी, ता. खेड, मूळ पत्ता- खटुता, पसवदरा, जि. बलोतरा, राजस्थान), भवरलाल सोनाराम जाट (वय 34, देशमुख आळी चाकण, ता. खेड, मूळ पत्ता- पोटाला, रानेकडा, जि. जालोर, राजस्थान) महेंद्रसिंग चिमणाराम (वय 25, रा. बाळू बोत्रे यांच्या भाड्याच्या खोलीत, सावरदरी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक दोन व तीन यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी यांनी दोन लाख किंमतीचा 396 ग्रॅम वजनाचा अफीम हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीकरिता वाहतूक करताना पोलिसांना आढळून आला .आरोपीकडून मिळून आलेला अफीम हा अंमली पदार्थ आरोपीने कोणाकडून आणला याबाबत आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीने सदर अफीम हा आरोपी क्रमांक तीन यांच्याकडून विक्री करिता आणल्याचे सांगितले .आरोपीकडून एक मोटरसायकल व दोन मोबाईल असा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खरात हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"