फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प, संतसृष्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या लोकार्पण!

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प, संतसृष्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या लोकार्पण!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे होणार भूमिपूजन,आणि उदघाटन…
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुणे-आळंदी पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज भेटीचे समुहशिल्प व संतसृष्टीचे लोकार्पण, संतपीठ येथील प्रेक्षागृह व कलादालन लोकार्पण यासह विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे, अशी माहिती पिंपरीचिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

याप्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .

लोकार्पण कार्यक्रम थोरल्या पादुका, वडमुखवाडी, च-होळी येथे सकाळी १०.३० वाजता होईल. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीमधील वारकरी संप्रदायाची व संतांची माहिती समजण्यासाठी संतसृष्टीची निर्मिती केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचे स्मरणरूप ‘संतसृष्टी’ साकारण्यात आली आहे. या ठिकाणी मिश्र धातूपासून तयार करण्यात आलेली २५ शिल्पे असून ज्यामध्ये संत नामदेव महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई आणि २० वारकरी समाविष्ट आहेत. या शिल्पांसोबतच चौथरा, रिटेनिंग वॉल, स्टोन क्लॅडिंग, ओपन एअर थिएटर, विद्युत आणि बागकाम, रेलिंग व स्वच्छतागृह यांची कामेही पूर्ण झाली आहेत.

viarasmall
viarasmall

या परिसरात संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित ४७ ब्रॉन्झ म्युरल्स उभारण्यात आले असून, त्यांच्या शेजारी माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. या संतसृष्टीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुभहस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चिखली येथील संतपीठ येथे प्रत्यक्ष भेट देणार असून तेथे उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृह व कलादालनाचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने टाळगाव चिखली येथे “संतपीठ“ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये तळमजला तसेच ५ मजले असे इमारतीचे नियोजन करण्यात आले असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १३१६१.७१ चौरस मीटर इतके आहे. या इमारतीमध्ये एकूण ४ उद्वाहक विकसित करण्यात आले आहेत. सोबतच दिव्यांग मुले आणि व्यक्तींकरिता रॅम्प ची सुविधा देखील करण्यात आली आहे. याशिवाय इमारतीमध्ये एकूण ५५ वर्गखोल्या,९ र्यालये ,४०
इतर खोल्या ज्यामध्ये प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष, प्रत्येक मजल्यावर स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता विस्तीर्ण मैदान आदींचे नियोजन केले आहे. इमारतीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था करण्यासाठी विद्युत विभागाच्या कामांचा देखील यामध्ये समावेश आहे. या संतपीठामध्ये उभारण्यात आलेल्या प्रेक्षागृह आणि कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेचयाठिकाणी पिंपरी चिंचवड शहरात १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात येईल.

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन, लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"