Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

चोरलेल्या मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट भंगार मध्ये विक्री करणारी टोळी जेरबंद!

चोरलेल्या मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट भंगार मध्ये विक्री करणारी टोळी जेरबंद!

आरोपींकडून पाच वाहने व वाहनांचे स्पेअर पार्ट जप्त
पिंपरी : दुचाकी मोटरसायकलींची चोरी करून त्यांचे स्पेअर पार्ट खोलून ते भंगार मध्ये विक्री करणारी टोळी बावधन पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपीकडून पाच वाहने व वाहनांचे स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपळे निलख येथील फॅब्रिकेशन च्या दुकानात करण्यात आली.

पवन मरिअप्पा भज्जी (वय 25, मेडी पॉईंट चौक, गायत्री हॉटेल मागे, संजय मुरकुटे यांच्या खोलीत, औंध), ऋषिकेश शहाजी साठे ( वय 29, रा. गणेश नगर, पिंपळे निलख , मेन बस स्टॉप शेजारी) आणि अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेण्यात आले. .

viara vcc
viara vcc

बाणेर येथील रोहन लेयर सोसायटी येथून सात सप्टेंबर रोजी फिर्यादी यांची यामाहा एमटी 15 मोटरसायकल नंबर (एम एच/ 13 ई डब्ल्यू/ 58 47) चोरी झालेबाबत बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या ठिकाणाहून दुचाकी चोरी गेली त्या भागातील 90 ते 100 सीसीटीव्ही फुटेची पाहणी करून कौशल्यपूर्ण तपास पोलिसांनी करून मोटरसायकल चोरट्यांचा शोध घेतला. चोरटे हे इंगवले चौक पिंपळे निलख येथे मोटरसायकल घेऊन गेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

indra dairy
indra dairy

तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी इंगवले, चौक पिंपळे निलख येथे जाऊन शोध घेतला असता हॉटेल जगदंबाचे मागे रेकॉर्डवरील आरोपी ऋषिकेश शहाजी साठे (रा पिंपळे निलख ) यांचे फेब्रिकेशनचे दुकान असून सदर दुकानांमध्ये चोरीस गेलेली मोटरसायकलचे आरोपी साठे याने वेगवेगळे स्पेअर पार्ट करून त्याची आरोपींमार्फत भंगार दुकानदारांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. फॅब्रिकेशनच्या दुकानातून एकूण पाच मोटरसायकली आणि अन्य मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट असे एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपी यांचे विरुद्ध वाकड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मुल्ला हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 चे प्रदीप जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त हिंजवडी विभाग विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे परवेज शिकलगार, गुन्हे प्रगटीकरण पथक पोलीस उपनिरीक्षक सारंग ठाकरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काळे, सहाय्यक पोलीस फौजदार बापूसाहेब धुमाळ, पोलीस हवालदार फारुख मुल्ला, अतिश जाधव, महेश शिंदे, सुहास डंगारे, ऋषिकेश पाटील, दत्तात्रय शिंदे, अक्षय लाटे या पथकाने केली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"