Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

2nd October 2026
गुन्हेगारी

पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मालमत्ता बळकावल्याचा आरोप!

पतीच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मालमत्ता बळकावल्याचा आरोप!

पिंपरी : आजारी पतीच्या शारीरिक स्थितीचा फायदा घेत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज करून त्यांच्या मालकीची जमीन बक्षीस पत्राद्वारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदाराच्या फिर्यादीवरून चौघा विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

नितीन बाबुराव दळवी (वय 55, रा. लोणावळा), संकेत जयवंत खानेकर (वय 30, रा. जांभूळ), संतोष शंकर गडपाळे (वय 52, रा.खोपोली) आणि एका 45 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीस वर्षीय महिला हवालदाराने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे दीर नितीन दळवी यांनी इतरांच्या मदतीने फिर्यादीच्या पतीला सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज करून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर कोथुर्णे येथील जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी बक्षीस पत्र तयार करण्यात आले. हे बक्षीस पत्र पतीने स्वच्छेने केले नसून दबाव आणि भीती दाखवून करून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहे.

indra dairy
indra dairy

हॉर्न वाजवल्याच्या रागातून हॉकी स्टिकने मारहाण!
पिंपरी : स्कुटी दुचाकी अचानक कार समोर आल्याने हॉर्न वाजवण्याचा राग मनात धरून टोळक्याने तरुणासह, त्याचे चुलते आणि मित्राला हॉकी स्टिक व लाकडी दांडक्याने मारहाण केली. काळेवाडी फाटा येथील पकवान हॉटेल जवळ बुधवार 30 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

हेमंत अनंता काळोखे (वय 28, रा. भुगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहम्मद नफीस रशीद कुरेशी (वय 40), हमजा नफीस कुरेशी (वय 18), शहाबान अब्दुल मजीद शेख (वय 22 सर्व राहणार काळेवाडी फाटा) यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चुलत्याच्या ब्रिझाकार मधून जात असताना स्कुटी अचानक आडवी आली. त्यामुळे हॉर्न वाजवल्यानंतर वाद झाला. त्यानंतर आरोपी पांढऱ्या फॉर्च्युनर मधून आले आणि हॉकी स्टिक, लाकडी दांडके व लाथा बुक्क्यांनी फिर्यादी त्यांचे चुलते अविनाश आणि मित्र नितेश यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत. हॉर्न वाजवल्याच्या रागातून हॉकी स्टिकने मारहाण!

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"