Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहात संपन्न; पोलीस आयुक्तांनी मानले आभार!

गणेशोत्सव शांततेत, सुरक्षितपणे आणि उत्साहात संपन्न; पोलीस आयुक्तांनी मानले आभार!

पिंपरी : गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत सुरक्षितपणे आणि उत्साह पूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शांतता समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सर्व नागरिकांचे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आभार मानले आहेत.

viara vcc
viara vcc

पोलीस आयुक्त चोबे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व नगरपरिषदा ,स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण व अन्य सर्व विभागांनी देखील मोलाचे सहकार्य केले आहे. या सहकार्यामुळेच हा उत्सव कोणतीही अनुचित घटना न घडता यशस्वीरित्या पार पडला आहे. त्यामुळे शहराच्या नावलौकिकात मोलाची भर पडली आहे.

indra dairy
indra dairy

गेल्या बारा दिवसात सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक शिस्तीत आणि सजग राहून चोख बंदोबस्त ठेवला आणि नागरिकांच्या अथक प्रयत्नामुळे गणेशोत्सव आणि विसर्जन सोहळा सुरळीत व शांततेत पार पडला. भविष्यात पोलीस प्रशासन, गणेश मंडळे, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांमधील उत्तम सहकार्य असेच कायम राहील आणि आपण संघ भावनेने आपल्या शहराची शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"