Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

14th September 2026
गुन्हेगारी

डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक; भामटा जेरबंद!

डॉक्टर असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक; भामटा जेरबंद!

पिंपरी : वैद्यकीय डिग्री नसताना पेशंटची तपासणी करून औषध व इंजेक्शन विक्री करीत असलेल्या एका भामट्या डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकले आहेत. ही कारवाई रविवार 16 ऑगस्ट रोजी श्रीनाथ हॉस्पिटलच्या जवळ, पांढरे वस्ती, पुनावळे येथे करण्यात आली.

याप्रकरणी डॉक्टर नंदकुमार मनोहर मोरे (वय 47, वैद्यकीय अधिकारी रा. प्लॉट नंबर 1002, इ- दोन, म्हाडा कॉम्प्लेक्स, संत तुकारामनगर) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भागवत टेटकुराम निषाद (वय 39, रा. वास्तु इम्पेरियर कन्ट्रक्शन साईट, रिलायन्स मॉलच्या पाठीमागे, रावेत, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्याकडे वैद्यकीय डिग्री नसताना तो औषध व इंजेक्शन विक्री तसेच पेशंट तपासणी करीत असे असा कॉल प्राप्त होताच पोलिसांनी स्टाफसह जाऊन तपासणी केली. त्याची वैद्यकीय अर्हता नसताना बेकायदेशीररित्या औषधे, इंजेक्शन देऊन औषधोपचार करून पेशंटची फसवणूक करीत होता. रावेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख व पोलीस उपनिरीक्षक खिळे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

मॅपेड्रॅान (एमडी) विक्रीकरिताबाळगल्याने एकास अटक!
पिंपरी : अवैधरित्या मॅपेड्रॅान (एमडी) अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली. ही कारवाई 15 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा सातच्या सुमारास नॅशनल हेवी कंपनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे करण्यात आली.

याप्रकरणी अक्षय गौतम कांबळे पोलीस शिपाई ,तपास पथक तळेगाव दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर अशोक शिंदे (वय 34, रा. ए-वन 1102, अभिमान सोसायटी, प्रति शिर्डी मंदिराजवळ शेरगाव, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने 2 लाख 35 हजार रुपये किंमतीचे एकूण 23 ग्रॅम 55 मिलिग्रॅम मॅपेड्रॅान (एमडी) अंमली पदार्थ विक्रीसाठी बेकायदेशीररित्या जवळ बाळगल्याने कारवाई करण्यात आली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार गवारी व पोलीस निरीक्षक (गुन्हे) कांबळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"