फक्त मुद्द्याचं!

18th June 2026
गुन्हेगारी

ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओ मध्ये सहभागी करून 39 लाख 80 हजार रुपयांची फसणूक!

ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओ मध्ये सहभागी करून 39 लाख 80 हजार रुपयांची फसणूक!

पिंपरी : ॲक्सिस सिक्युरिटी लिमिटेडचे ग्रुप ॲडमिन यांनी विश्वास संपादन करून एका ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओ मध्ये व्यक्तीला सहभागी करून त्यांच्या बँक खात्यातून 39 लाख 80 हजार 579 रुपये काढून फसवणूक केली. ही घटना 13 नोव्हेंबर 2025 ते 17 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अनुतेज हाऊसिंग सोसायटी, काटे रेसिडेन्सी, दापोडी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी विशाल प्रभाकर पाटील (वय 45, रा.सी ए, 07 अनुतेज हाउसिंग सोसायटी, काटे रेसिडेन्सी, दापोडी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अतुल मेहरा ॲक्सिस सिक्युरिटी लिमिटेड व ॲक्सिस सेक्युरिटी लिमिटेड कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ॲक्सिस सिक्युरिटी लिमिटेडचे ग्रुप ॲडमिन फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओ मध्ये त्यांना सहभागी करून फिर्यादी यांच्या एचडीएफसी बँक, कल्याणी नगर येथील शाखेतून अकाउंट नंबर आयएफसी कोड असलेल्या बँक खात्यातून एकूण 39 लाख 80 हजार 579 रुपयांची वेगवेगळ्या 13 बँकेच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले. ॲक्सिस सिक्युरिटी लिमिटेड, ॲक्सीस सिक्युरिटी लिमिटेड कंपनीच्या व्हाट्सअप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन अतुल तसेच कस्टमर केअर यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"