फक्त मुद्द्याचं!

8th May 2026
गुन्हेगारी

डिस्काउंटमध्ये कार देतो असे सांगून 1 कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक!

डिस्काउंटमध्ये कार देतो असे सांगून 1 कोटी 51 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : डिस्काउंट मध्ये कार देतो असे सांगून एका व्यक्तीची 14 लाख 91 हजार 875 रुपयांची आणि त्यांच्या मित्रांची रोखीने आणि क्रेडिट कार्डद्वारे एक कोटी 36 लाख 97 हजार 942 असे एकूण एक कोटी 50 लाख 84 हजार 817 रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना 28 ऑक्टोबर 2024 ते 7 मे 2026 या कालावधीत हिंजवडी, तालुका मुळशी येथे घडली.

viara vcc
viara vcc

याबाबत दत्तात्रेय रामचंद्र गाडे (वय 35, रा. बी- 901, पाल्म स्प्रिंग सोसायटी, नियर एस बी पाटील कॉलेज, रावेत) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार प्रतीक बाबुलाल मुंदडा (रा. 2203, बी -आठ, ब्लूरिज सोसायटी, फेज एक, हिंजवडी, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने फिर्यादीस डिस्काउंट मध्ये कार देतो असे सांगून फिर्यादी यांना कार बुक करायला लावून कसलेही डिस्काउंट न देता फिर्यादी कडून कारचे नावाखाली तसेच उसने असे एकूण 14 लाख 91 हजार 875 रुपये घेतले. त्यापैकी एक लाख 5000 रुपये परत देऊन उर्वरित 13 लाख 86 हजार 875 रुपये परत दिले नाहीत. तसेच इतर साक्षीदार यांचे कडून फिर्यादी यांच्या मित्रांकडून देखील 20% कार डिस्काउंट मध्ये देतो अशी बतावणी करून त्यांच्याकडून अकाउंट द्वारे रोखीने क्रेडिट कार्डद्वारे एक कोटी 36 लाख 97 हजार 942 रुपये घेऊन एकूण एक कोटी पन्नास लाख 84 हजार 817 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"