फक्त मुद्द्याचं!

8th May 2026
गुन्हेगारी

शेअर ट्रेडिंगमध्ये ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून फसवणूक!

शेअर ट्रेडिंगमध्ये ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून फसवणूक!

पिंपरी : शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ज्यादा परताव्याचे आमीष दाखवून जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीची 26 लाख 39 हजार 750 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 नोव्हेंबर 2025 पाच मे 2026 या कालावधीत द्वारका सनक्रिस्ट अपार्टमेंट, फेज एक, पिंपळे सौदागर, कोकणे चौक, रहाटणी येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी 58 वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंगलम गणेश तिचा सहकारी रूप भूतरा आणि मॅनेजर अशा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना मेसेज करून सांगितले की, आनंद राठी कंपनीच्या ग्रुपची कर्मचारी बोलत आहे. फिर्यादीला ar -160, waveband players club व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील करून शेअर मार्केटची माहिती रोजच्या रोज व्हाट्सअप ग्रुप वर मॅनेजर रूप भुत्रा यांनी देऊन फिर्यादीला गुंतवणुकीत जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमीष दाखवले. तर मंगलम गणेश हिचा सहकारी याने मोबाईल वरून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून फिर्यादीची दिशाभूल करून जाणीवपूर्वक फसवणूक करण्याच्या उद्देशाने ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून फिर्यादीची 26 लाख 39 हजार 750 रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"