Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

ज्यादा रकमेचे आमिष दाखवून 3 कोटी 52 लाखांची फसवणूक

ज्यादा रकमेचे आमिष दाखवून 3 कोटी 52 लाखांची फसवणूक

चाकण : ट्रेडिंग, मॅच्युअल फंड आणि एसआयपीए मध्ये गुंतवणुकीवर दरमहा मोठा परतावा देण्याचे अमिष दाखवून 53 गुंतवणूकदारांची 3 कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना मे 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत आंबेठाण रोड चाकण येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सतवीर सिंग मथुराम गोदारा (वय 45, आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रकाश नागनाथ शिंदे, ईश्वर शंकर हसणाळे, सुरजित सिंग कुकणा, सुरेंद्र सुधार , जितेंद्र कुमार वर्मा (संचालक, साई नंदन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंतवणूकदारांना दरमहा 3.5 ते 3.75 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून साईनंदन कन्सल्टन्सी कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. सुरुवातीच्या काही काळात परतावा देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मूळ रक्कम आणि परतावा न देता फिर्यादीचे 15 लाख 69 हजार रुपये आणि अन्य 52 जणांचे मिळून सुमारे 3 कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक केली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कदम, पोलीस निरीक्षक शिर्के तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"