Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
महाराष्ट्र

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला!

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला!

हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी केली अटक
नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडच्या गुरुद्वारात हल्ला करण्यात आला आहे. नांदेड साहेब गुरुद्वारात निहंग गटाने त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

viara vcc
viara vcc

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आपली पत्नी आणि शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हर शिमरत कौर बादल यांच्यासह गुरुद्वारात आले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका निहंगाने तलवारीने त्यांच्या हातावर आणि खांद्यावर वार केला. यावेळी त्या ठिकाणी चार निहंग उपस्थित होते. बादल यांच्या सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप करून हल्लेखोराला बाजूला केले. हल्लेखोर निहंगाला पोलिसांनी अटक केली आहे. . गुरुद्वारातील हल्ल्यानंतर सुखबीर सिंग बादल यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्यावर यापूर्वीही गुरुद्वारात हल्ला झाला आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. धार्मिक शिक्षा मिळाल्यानंतर सुखबीर सिंग बादल सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून सेवा देत होते यावेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"