फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश!

भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला भाजपला जबरदस्त धक्का
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाजपला जबरदस्त धक्का देत भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांना आज राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपवर मोठा राजकीय पलटवार केला आहे.

viara vcc
viara vcc

दोन दिवसापूर्वी भाजपाने राष्ट्रवादी कॅांग्रेस ,शिवसेना उबाटा गठाला मोठा धक्का दिला आहे.त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद पिंपरी गावात उमटले असून, याच पार्श्वभूमीवर संदीप वाघेरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारण, दुर्लक्षाची भावना आणि स्थानिक कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी संदीप वाघेरे यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत, “कार्यकर्त्यांचा सन्मान आणि निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस,” असा इशारा दिला आहे. आयारामांना पक्षात प्रवेश दिल्याने वेगळा निर्णय घ्यावा लागला असे संदीप वाघेरे यांचे म्हणणे आहे.

संदीप वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक असून, त्यांच्या प्रवेशामुळे संबंधित प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून भाजपा मध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लागण होण्याची शक्यता भाजपा मध्ये व्यक्त केली जात आहे,

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"