मतदार संघातील विकासकामांना गती देण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा!

प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत चिंचवड मतदार संघातील माजी नगरसेवकांची बैठक
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे आणि मूलभूत सुविधांशी संबंधित अडचणींवर चर्चा करण्यासाठी त्यांनी आज (गुरुवारी) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांच्या समवेत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला चिंचवड मतदारसंघातील माजी नगरसेवक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत चर्चा झालेले मुद्दे
शहरातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि रस्त्यांची नियमित स्वच्छता.
पाणीपुरवठा व विद्युत समस्या .
वाहतूक कोंडी व रस्ते सुधारणा .
पादचाऱ्यांच्या सोयीसाठी अतिक्रमण हटवून फुटपाथची योग्य देखभाल.
बटरफ्लाय ब्रिज : रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश.
पिंपळे सौदागरचा जुना पूल : काम तातडीने सुरू करण्याची सूचना.
वाकड दत्त मंदिर रस्ता : प्रलंबित रस्त्याचे काम गतीने पूर्ण करणे.
शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर : पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आयआयटीच्या तंत्रज्ञानाचा तातडीने वापर.
मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना.
बेकायदेशीर नळ कनेक्शनवर कारवाई.
स्थापत्य, ड्रेनेज व पाणीपुरवठा विभागासाठी पुरेशी बजेट तरतूद.
बैठकीला माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके तसेच माजी नगरसेविका माधुरी कुलकर्णी, अश्विनी चिंचवडे, चेतन भुजबळ, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नीता पाडाळे, ज्योती भारती, अभिषेक बारणे, तानाजी बारणे, संदीप गाडे, सिद्धेश्वर बारणे, आरती चोंधे, निर्मला कुटे, सागर अंघोळकर, वैशाली जवळकर, महेश जगताप, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, शारदा सोनावणे, शेखर चिंचवडे, राहुल जवळकर, हर्षद नढे, हिरेन सोनावणे, संकेत चोंधे, विलास पाडाळे आणि संकेत कुटे आदी उपस्थित होते.