फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
गुन्हेगारी

कामावरून काढलेला ट्राफिक वार्डन निघाला चोर!

कामावरून काढलेला ट्राफिक वार्डन निघाला चोर!

पिंपरी : कामावरून काढलेल्या ट्राफिक वॉर्डनने पोलिसांनी जप्त केलेली दुचाकी चोरी करून त्या चोरलेल्या दुचाकीवरूनच महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले .याबाबत वाकड पोलिसांनी आरोपी ट्राफिक वॉर्डनला अटक केली आहे.

viara vcc
viara vcc

सचिन मानसिंग चव्हाण (वय 27, बोडके वस्ती, माण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 एप्रिल रोजी सकाळी थेरगाव येथील गणेश मंदिर येथे फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या एका चोरट्याने चोरून नेले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाकड पोलिसांच्या पथकाने परिसरातील सुमारे दीडशे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा येण्या- जाण्याचा मार्ग निश्चित केला आणि संशयित आरोपी सचिन चव्हाण याला माण येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने थेरगाव येथील चोरीसह आणखी एक चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चतुर्श्रुंगी येथे वाहन चोरीचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. पोलिसांनी सचिन कडून दोन दुचाकी, 23 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी सचिन हा यापूर्वी चतुशृंगी वाहतूक विभागात ट्राफिक वॉर्डन म्हणून काम करत होता. त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला पाच महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकले होते .त्यानंतर आरोपीने मार्च 2026 दरम्यान वाहतूक विभागाजवळ डिटेन करून ठेवलेल्या दुचाकी मधील एक मोपेड चोरी केली आणि त्याच दुचाकीचा वापर चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, पोलीस निरीक्षक किशोर पाटील, सहाय्यक निरीक्षक अमरीश देशमुख, श्रीनिवास दराडे, उपनिरीक्षक बिभिशन कन्हेरेकर, सहाय्यक उपनिरीक्षक संदीप गवारी यांनी केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"