फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
पिंपरी-चिंचवड

अग्निशमन दलाच्या प्रतिसादामुळे भंगार साहित्याच्या गोदामातील आग नियंत्रणात!

अग्निशमन दलाच्या प्रतिसादामुळे भंगार साहित्याच्या गोदामातील आग नियंत्रणात!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील भंगार साहित्याच्या गोदामाला (स्क्रॅप यार्ड) आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग नियंत्रणात आणली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागातून देण्यात आली.

viara vcc
viara vcc

अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने अग्निशमन दलाच्या एकूण १० वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवत ही आग पूर्णपणे विझवली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आपल्या परिसरातील अनावश्यक स्क्रॅप टेरेस, बाल्कनी, पार्किंग, बेसमेंट अशा ठिकाणी साठवून ठेवलेले सर्व ज्वलनशील अनावश्यक साहित्याची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. यार्डमध्ये लाकूड आणि प्लास्टिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती, परंतु सर्व अग्निशमन पथकांनी सर्व दिशांनी पाण्याचे फवारे मारून आगीचे प्रमाण सुरुवातीला नियंत्रणात आणले आणि समन्वय साधून आग विझवण्यात यश मिळवले. – ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"