फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

फिल्म डिस्ट्रीब्युशन,मुक्त मंच व ज्युरी चर्चा ;चित्रपट निर्माते,विद्यार्थी,अभ्यासकांचा सहभाग !

फिल्म डिस्ट्रीब्युशन,मुक्त मंच व ज्युरी चर्चा ;चित्रपट निर्माते,विद्यार्थी,अभ्यासकांचा सहभाग !

पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहण्यासोबत फिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा अशा महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विशेष सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये चित्रपट वितरण, ज्युरी प्रक्रिया, चित्रपट समीक्षण तसेच ओपन फोरमद्वारे प्रेक्षक व चित्रपटकार यांच्यातील संवाद या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये सुप्रसिद्ध फिल्म विश्लेषक, महोत्सव क्युरेटर अजय फुटाणे , ज्येष्ठ लेखक, संशोधक आणि चित्रपट अभ्यासक श्रीकांत अगवने , स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक हेमंत अवताडे, वितरण व्यवस्थापन व मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ संतोष संखद, तरुण व प्रयोगशील चित्रपटकार शुभम सुदरिक, युवा दिग्दर्शक व समीक्षक पवन खाडे, माहितीपट व इंडी चित्रपट निर्माता रोहन शिंगाडे, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट निर्माते धनंजय साबळे सहभागी झाले होते.

viarasmall
viarasmall

आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील दोन्ही सभागृह तसेच चिंचवड मधील छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा फुले सभागृहामध्ये ५० देशातील सुमारे ८० हून अधिक चित्रपट, लघुपट व माहितीपट दाखवले जात आहेत. यासाठी मुंबा फिल्म फाउंडेशन व पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या सहकार्यातून चित्रपट महोत्सव सुरू आहे.

या कार्यक्रमाला शहर परिसरातील अनेक चित्रपट निर्माते, विद्यार्थी, अभ्यासक आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. या चर्चासत्रातून उपस्थितांना कलाक्षेत्रातील नव्या दृष्टीकोनाची आणि व्यावसायिक दिशा मिळाली. भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट वितरण प्रणाली, नवोदित फिल्ममेकरसाठी संधी व अडचणी, ओटीटी प्लॅटफॉर्म्सची वाढती भूमिका तसेच फेस्टिवल ज्यूरीच्या मूल्यांकन निकषांवर विस्ताराने चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी वक्त्यांनी अनेक उदाहरणांसह अनुभव कथन केले.

सत्राची वैशिष्ट्ये:
• प्रेक्षकांसाठी खुले मंच ज्यामध्ये उपस्थित चित्रपटप्रेमींनी थेट प्रश्न विचारून संवाद साधला.
• नवोदित फिल्ममेकरसाठी मार्गदर्शनपर सल्ले व प्रेरणादायी अनुभव कथन.
• चित्रपट महोत्सवांमधील ज्यूरी प्रक्रिया व मूल्यांकन कसे पार पडते, यावर विशेष माहिती.
• वितरणासाठी योग्य मार्केटिंग, रणनीती व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे उपाय.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"