Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

25th October 2026
गुन्हेगारी

कोयत्याचा धाक दाखवून हप्ता वसुली; वाहनांच्या काचा फोडल्या!

कोयत्याचा धाक दाखवून हप्ता वसुली; वाहनांच्या काचा फोडल्या!

पिंपरी : सार्वजनिक रस्त्यावर कार पार्क करायची असल्यास दरमहा हप्ता द्यावा लागेल असे सांगत टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून तरुणाकडील दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर कार सह परिसरातील इतर वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. काळेवाडीतील नढे नगर येथील अजिंक्य कॉलनी परिसरात शनिवार पाच सप्टेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

पवन अशोक जैतमल (वय 29, रा. अजिंक्य कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. अमन मनिर शेख (वय 21, तापकीर मळा, काळेवाडी), आर्यन कोरे, सौरभ पाटोळे व हर्षल वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी अमन शेख याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीच्या दाजीने घरासमोरील रस्त्यावर कार पार्क केली होती. आरोपींनी येथे कार लावायचे असल्यास दरमहा हप्ता द्यावा लागेल असे सांगून दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादीवर कोयता उभारला. त्यांच्या खिशातील 1 हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर फिर्यादीच्या कारसह कॉलनीतील अन्य वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

viara vcc
viara vcc

बांधकाम साइटवरून अल्युमिनियम प्लेट्स चोरीचा प्रयत्न!
पिंपरी : बांधकाम साइटवर अनधिकृत पणे प्रवेश करून 25 हजार रुपये किंमतीच्या सुमारे 120 किलो ॲल्युमिनियम कॉर्नर प्लेट्स रिक्षातून चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी रंगेहात पकडले. सुस येथील व्हीटीपी रियालिटीच्या जागेत सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

या प्रकरणी राहुल शंकर हारगुडे (वय 35, रा. आळंदी, ता. खेड )यांनी फिर्याद दिली आहे. साबीर सईद शेख (वय 35), रेखा शिंदे (दोघेही रा. सुस, ता. मुळशी) यांच्यासह अन्य महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी बांधकामाच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून तेथील 25 हजार रुपये किमतीच्या अल्युमिनियम कॉर्नर प्लेट्स (एमएच 12 ,वीडब्ल्यू/ 56 41) क्रमांकाच्या रिक्षात भरल्या. सुमारे 120 किलो वजनाच्या या प्लेट्स चोरून नेत असताना सुरक्षा सुरक्षारक्षकांनी आरोपींना रंगीहात पकडले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"