चऱ्होली येथील प्राइड वर्ल्ड सिटी मध्ये ज्येष्ठ नागरिक संघ वेलिंग्टन फोरमची स्थापना!

पिंपरी : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी चऱ्होली येथील 400 एकर मधील टाऊनशिप प्राइड वर्ल्ड सिटी मध्ये ज्येष्ठ नागरिक संघ वेलिंग्टन ( Pride World City Wellington senior citizen forum ) या फोरमची स्थापना करण्यात आली. फोरम चे उद्घाटन प्राइड वर्ड सिटी चे चेअरमन अरविंद जैन, माजी महापौर व विद्यमान नगरसेवक नितीन काळजे , नगरसेवक .सचिन तापकीर तसेच दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी केले.

या प्रसंगी फोरमच्या वतीने मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले याचा लाभ 400 नागरिकांनी घेतला. सदर प्रसंगी फोरम च्या कार्यकारणीचे घोषणा करण्यात आली. फोरमचे अध्यक्षपदी कैलास पंढरीनाथ नेवासकर, उपाध्यक्ष मदन मोहन मिश्रा व सौ. यशश्री कसरेकर, जनरल सेक्रेटरी डॉ. दिलीप शेटे, सेक्रेटरी .शेषपाल हजारी, सौ.संध्या पटवर्धन, कोषाध्यक्ष श्रीमती शालिनी बंदावणे,अशोक गावंडे, संचालक नामदेव कावासादीकर, श्रीमती सुनंदा बराई, श्रीमती अनिता देशमुख यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन वेलिंग्टन सांस्कृतिक समिती यांनी केले.

