Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

30th October 2026
पिंपरी-चिंचवड

निधी नसल्याने महापालिका ५० हजारच कापडी झेंड्याची खरेदी करणार!

निधी नसल्याने महापालिका ५० हजारच कापडी झेंड्याची खरेदी करणार!

पिंपरी : स्वातंत्र्यदिनी ‘घरोघरी तिरंगा अभियान’ पिंपरी चिंचवड महापालिका राबवणार असून त्यासाठी महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने थेट पद्धतीने पन्नास हजार कापडी झेंडे खरेदीची ऑर्डर दिली आहे. यासाठी एकूण 24 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

viara vcc
viara vcc

राज्य शासनाच्या आदेशानुसार दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा अभियान’ राबवण्यात येत आहे. शहरातील नागरिकांना कापडी झेंडे वितरित केले जाणार असून महापालिकेच्या 10 क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रत्येकी 20 हजार कापडी ध्वजाचे वाटप केले जाणार आहे. दहा क्षेत्रीय कार्यालयासाठी तब्बल दोन लाख ध्वज आवश्यकतेनुसार खरेदी केले जाणार आहेत. हे कापडी ध्वज महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ संस्थेकडून खरेदी करण्यात येणार आहेत.

या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी निधी नसल्याचे कारण देत केवळ 50 हजार झेंडे खरेदीस मान्यता दिली आहे. त्यानुसार जनसंपर्क विभागाने थेट पद्धतीने झेंडे खरेदीची मागणी मध्यवर्ती भंडार विभागाकडे केली आहे .आयुक्तांनी मान्यता दिल्यानुसार एकूण पन्नास हजार झेंडे खरेदी ऑर्डर देण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"