फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
पिंपरी-चिंचवड

240 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह खटले दाखल!

240 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्ह खटले दाखल!

पिंपरी : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी वाहन चालक मद्य प्राशन करून वाहने वेगात चालवून वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. याच उद्देशाने 31 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये 240 वाहन चालकांवर मद्य प्राशन करून वाहन चालवल्याबद्दल न्यायालयात ड्रंक अँड ड्राईव्ह चे खटले दाखल करण्यात येत आहेत अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या 13 वाहतूक विभागांमार्फत पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेकडून मद्य प्राशन करून वाहन चालविणारे वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेशाने पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 31 डिसेंबर 2025 वर्ष अखेर व नूतन वर्ष 2026 आगमन नागरिक मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा करतात. हा जल्लोष साजरा करताना वाहन चालक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये एकूण 47 ठिकाणी सुरक्षेची काळजी म्हणून नाकाबंदी करण्यात आली होती. विशेष करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान 220 मोटरसायकलस्वार व वीस चार चाकी वाहन चालक असे एकूण 240 वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवीत असताना आढळून आले. त्यांच्यावर न्यायालयात ड्रंक अँड ड्राईव्ह चे खटले दाखल केले जाणार आहेत असे पाटील यांनी सांगितले.

 यापुढेही अशाच प्रकारे विशेष मोहीम राबवण्यात येणार असून वाहन चालकांनी मध्य प्राशन न करता वाहने चालवून होणारी न्यायालयीन कार्यवाही टाळावी असे आवाहन विवेक पाटील यांनी केले आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"