फक्त मुद्द्याचं!

2nd December 2025
पिंपरी-चिंचवड

डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मिळतेय गती!

डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मिळतेय गती!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबवण्यात येतेय व्यापक मोहीम
पिंपरी : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यापक मोहीम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेऊन ती त्वरित नष्ट करणे, डासनाशक फवारणी करणे, अशा मोहिमा व्यापकपणे राबवण्यासोबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास देखील प्राधान्य दिले जात आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. औषध फवारणी, घरांची व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी यासोबतच जनजागृती व दंडात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे. याशिवाय घराघरात माहितीपत्रकांचे वाटप, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, प्रभागस्तरावर विशेष अभियान, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कामकाज सुरू आहे.

आठही प्रभागांत मिळून आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई
घरांची तपासणी: एकूण ६ लाख ७७ हजार २२२ घरांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ११ हजार ४९० ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक परिस्थिती आढळून आली.
कंटेनर तपासणी: ३६ लाख ४ हजार ७२१ कंटेनर तपासण्यात आले असून, त्यातील १२ हजार ४४५ कंटेनरमध्ये डास वाढीसाठी पोषक वातावरण होते.

भंगार दुकाने तपासणी: एकूण १ हजार ४९५ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. बांधकाम स्थळे: १ हजार ८१२ बांधकाम स्थळांची तपासणी करण्यात आली. यामध्ये साचलेले पाणी व अस्वच्छता निदर्शनास आली. दंडात्मक कारवाई: ३ हजार ७०६ ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या. ८३३ नागरिक व आस्थापनांवर थेट कारवाई करून २९ लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरभर धडक मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेस सर्वतोपरी सहकार्य करावे. — सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"