Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
पिंपरी-चिंचवड

‘ड’ प्रभागांतर्गत नवीन अग्निशमन केंद्रासाठी जागा हस्तांतरित करण्याची मागणी!

‘ड’ प्रभागांतर्गत नवीन अग्निशमन केंद्रासाठी जागा हस्तांतरित करण्याची मागणी!

पिंपरी करून कामास गती देणे तसेच ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विद्यमान अग्निशमन केंद्रावर अग्निशमन वाहनांची व मनुष्यबळाची वाढविण्यात यावी अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या गृहसंकुलांची संख्या, व्यावसायिक आस्थापना तसेच उंच इमारतींची वाढ लक्षात घेता, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम व तत्पर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे.

indra dairy
indra dairy

‘ड’ प्रभागांतर्गत नवीन अग्निशमन केंद्र विकसित करण्याचे नियोजन असून, सदर अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक असलेली जागा तातडीने हस्तांतरित करून पुढील प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण कराव्यात आणि नवीन अग्निशमन केंद्राच्या कामाला तातडीने गती देण्यात यावी, अशी मागणी आहे. सदर केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन सेवेचा अधिक जलद व प्रभावी लाभ मिळू शकणार आहे.

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सध्या कार्यरत असलेल्या अग्निशमन केंद्रावर आवश्यकतेच्या तुलनेत अग्निशमन वाहनांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत एखादे वाहन अन्य ठिकाणी कार्यरत असल्यास संबंधित केंद्रावर वाहन उपलब्ध नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर आवश्यक संख्येने अग्निशमन वाहने कायमस्वरूपी उपलब्ध राहतील, याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे.

त्याचबरोबर सदर अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अग्निशमन अधिकारी, जवान व इतर संबंधित मनुष्यबळाची संख्या वाढविण्यात यावी, जेणेकरून उपलब्ध वाहनांचा प्रभावीपणे वापर करता येईल आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता येईल. त्यामुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खालीलप्रमाणे तातडीने कार्यवाही करण्यात यावी :

  1. ‘ड’ प्रभागांतर्गत विकसित होणाऱ्या नवीन अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा तातडीने हस्तांतरित करण्यात यावी.
  2. नवीन अग्निशमन केंद्राच्या कामास प्रशासकीय व तांत्रिक बाबींची पूर्तता करून तातडीने गती देण्यात यावी.
  3. नवीन अग्निशमन केंद्राचे काम निर्धारित कालावधीत पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत कार्यान्वित करण्यात यावे.
  4. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यमान अग्निशमन केंद्रावर अग्निशमन वाहनांची संख्या वाढविण्यात यावी.
  5. सदर केंद्रावर आवश्यकतेनुसार अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी.
  6. आपत्कालीन परिस्थितीत वाहन व मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, यासाठी आवश्यक कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी.

वरील बाबी नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित असल्याने, सदर विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागास तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत व नवीन अग्निशमन केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असे काटे यांचे म्हणणे आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"