Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
पिंपरी-चिंचवड

अप्पू घर मनोरंजन केंद्र पुन्हा जुन्या ठेकेदाराला चालविण्यास देण्याचा निर्णय!

अप्पू घर मनोरंजन केंद्र पुन्हा जुन्या ठेकेदाराला चालविण्यास देण्याचा निर्णय!

सत्ताधारी भाजपमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर
पिंपरी : निगडी येथील अप्पू घर मनोरंजन केंद्राच्या ठेक्यास सत्ताधारी भाजपच्या आणि त्या प्रभागातील भाजपच्या चारही नगरसेवकांनी विरोध केला असताना दुसऱ्यांदा पंधरा वर्षासाठी हे मनोरंजन केंद्र पूर्वीच्याच ठेकेदाराला देण्याचा निर्णय महापालिका सभेत तासभराच्या चर्चेनंतर घेण्यात आला सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थानी महापौर रवी लांडगे होते.

viara vcc
viara vcc

सत्ताधारी भाजपमधील गटबाजी या निर्णयामुळे पुन्हा एकदा उघड झाली आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीत ठरलेले निर्णय एकमताने सर्वसाधारण सभेत घ्यावेत असे ठरविण्यात आले होते. परंतु अनेक ज्येष्ठ नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध विरोध केला .अखेर शहरात पर्यटन केंद्र व सुविधा हव्यात, नियंत्रण समिती तयार करून त्यावर देखरेख ठेवावी, तीन महिन्यात आराखडा तयार करावा, सुरेक्षेची जबाबदारी निश्चित करावी अशा उपसुचणेसह हा विषय महापौरांनी मंजूर केला.

महापालिकेचे अप्पू घर हे सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराचे कुरण असल्याची चर्चा होती एकूण सात एकर जागेवर हे केंद्र उभारण्यात आले आहे. सध्या वर्षाला सात लाख रुपये भाडे आहे. संबंधित ठेकेदार दीड वर्षात 18 कोटी 60 लाख रुपये खर्च करून अद्ययावत खेळणी उभारणार आहे. त्यानंतर ठेकेदाराला आणखी पंधरा वर्षाची मुदतवाढ दिली जाणार आहे. या विषयाला प्रभागातील भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ .अमित गावडे .उपमहापौर शर्मिला बाबर. माजी उपमहापौर शैलेजा मोरे. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे .माजी महापौर राहुल जाधव यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विरोध केला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आयुक्त सूर्यवंशी यांना एक पत्र देऊन हा विषय मंजूर करू नये अशी मागणी केली आहे. परंतु हा विषय स्थायी समितीमार्फत मंजूर केल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील अप्पू घर मधील खेळणी जुनी झाल्याने ती बदलून नव्याने अप्पू घर विकसित करण्यासाठी पुष्पक अम्युजमेंट या संस्थेमार्फत 18 कोटी 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. स्थायी समितीच्या 29 जुलै रोजी झालेल्या सभेत अप्पू घर नूतनीकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 35 वर्षांपूर्वी अप्पू घर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात आले होते. त्यावेळीच अप्पू घरच्या खेळण्याबाबत अनेक तक्रारी होत्या. या मनोरंजन केंद्रातील खेळणी जुनी बसविली असल्याचा आरोप करण्यात आला होता.. त्यामुळे जुने आणि जीर्ण झालेली यंत्रसामग्री आणि खेळणी परिस्थितीनुसार बदलण्याची गरज देखील आहे. बाजारात नवीन पद्धतीची खेळणी येत असल्याने नव्या पर्यटन स्थळांच्या स्पर्धेशी स्पर्धा करणे येथील ठेकेदारांना अवघड होत आहे असा दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. पाण्यावरील घसरगुंडी, फ्लाईंग सिनेमा, 360 अंशातील इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेज व इन्फिनिटी नायगरा कृत्रिम धबधबा, किड्स ट्राफिक पार्क ,अक्रोड गेम्स, एआरव्ही आर झोन ,इंटरऑक्टिव्ह सेल्फी झोन, यासारख्या आधुनिक व थरारक राईटची भर आधुनिकीकरणामुळे पडणार आहे. स्मार्ट पार्किंग ,आधुनिक फूड कोर्ट, डिजिटल तिकीट प्रणाली, पिण्याचे पाणी तसेच ड्रेनेची उत्तम व्यवस्था नव्याने केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी फायबर सेफ्टी, सीसीटीव्ही यंत्रणा, आपत्कालीन यंत्रणा, स्ट्रक्चर सेफ्टी, अतिथी विमा सार्वजनिक दायित्व विम्यासह सर्व मानांकनाचे पालन बंधन करण्यात आले आहे.

अप्पूघर आधुनिक पद्धतीने डेव्हलप केल्यानंतर सध्याच्या ठेकेदाराला पुढील पंधरा वर्षासाठी थेट पद्धतीने चालवण्यासाठी देण्यात येणार आहे. सुरुवातीला दहा टक्के भाडे दरवाढ करून दरवर्षी पाच टक्के दरवाढ केली जाणार आहे. या अटीवर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"