फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

चेंबूरच्या गोविंदा पथकाने फोडली पिंपरीतील हंडी

चेंबूरच्या गोविंदा पथकाने फोडली पिंपरीतील हंडी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : बॉलिवूडमधील तारकांची उपस्थिती आणि ‘गोविंदा आला रे…’ ‘मच गया शोर सारी नगरी में…’, ‘चांदी की डाल पर सोनेका चोर…’ अशा या गाण्यांवर ठेका धरून, उंच मनोरे रचत पिंपरी गावात गोविंदांनी मंगळवारी रात्री दहीहंडी फोडली. संदीपभाऊ वाघेरे युवा मंचच्या वतीने आयोजित पिंपरी गावातील मानाची दहीहंडी चेंबूर येथील सद्गुरू साईनाथ गोविंदा पथकाने सात थर लावून फोडली.

पिंपरी गावात सर्वात मोठी दहीहंडी पाहण्यासाठी गर्दी होत असते. तपोवन मंदिर येथे संपर्क कार्यालयाजवळील मैदानावर सायंकाळी सातला उत्सवाला सुरुवात झाली. पावसाच्या हलक्या सरी, गोविंदांचा अपूर्व उत्साह आणि सिनेसृष्टीतील सिने तारे-तारकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी केजीएफ आणि ब्रम्हास्त्र चित्रपटातील अभिनेत्री मौनी रॉय, मराठीतील अभिनेत्री साक्षी गांधी, शिल्पा ठाकरे, निशाणी बोरुळे, सोनाली पाटील, ऐश्वर्या शेटे व्यासपीठावर येताच उपस्थितांनी कल्ला केला. यावेळी कलावंताचा नृत्याविष्कार लक्षवेधी होता.

दहीहंडीसाठी मुंबई, ठाणे व पुणे, पिंपरी चिंचवड मधून अनेक गोविंदा पथक या ठिकाणी आले होते. त्यानंतर सद्गुरू साईनाथ गोविंदा पथकाने थर लावून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्यासाठी तरुणाईची चढाओढ लागली होती. तर दहीहंडी प्रेमींनी आपले मोबाईलमध्ये टॉर्च लावले होते. रात्री १० च्या सुमारास तरुणांच्या सळसळत्या उत्साही वातावरण दिसून आले. चित्तथरारक सात थरांचा मानवी मनोरा रचत ७ लाख ७७ हजारांची दहिहंडी फोडली. यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, संयोजक संदीप वाघेरे, राजवीर वाघेरे, माजी उपमहापौर तुषार हिंगे आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"