फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पिंपरी-चिंचवड

काँग्रेसकडून शिवपुतळा दुर्घटनेचा निषेध

काँग्रेसकडून शिवपुतळा दुर्घटनेचा निषेध

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, सरकारने जबाबदार मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, माफी मागावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज राहटणी येथील शिवछत्रपती स्मारकाजवळ युवक काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आला.

याप्रसंगी निषेधाच्या घोषणा देत झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सांस्कृतिक मंत्री यांच्या फोटोला जोडे मारले. कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला. दुर्घटनेला जबाबदार भाजप सरकारचा धिकार असो, माफी मांगो माफी मांगो भाजप सरकार माफी मांगो, मंत्र्यांनी राजीनामे दिलेच पाहिजे, दुर्घटनेला जबाबदार मुजोर सरकारचा धिकार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. सकाळी ११ वाजता झालेल्या निषेध आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी केले.

शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, उमेश खंदारे, ज्येष्ठ गांधीवादी वक्ते बी. आर. माडगूळकर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, आबासाहेब खराडे, स्वप्निल बनसोडे, कौशल्य विकास विभागाचे अध्यक्ष रवी नांगरे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, निखिल भोईर, करण गील, हरीश डोळस, स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, सुप्रिया पोहरे, जितेंद्र छाब्रा, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष अँथोनी जेवियर, अनिकेत नवले, स्वप्नील नवले, आप्पा कांबळे, तेजस पाटील, सौरभ बिराजदार, पार्थ पाटील, रोहन मडीकर, शेखर क्षीरसागर, आदित्य वाघमारे, युनूस बागवान, किरण नढे, जय ठोंबरे उपस्थित होते. रहाटणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेला जबाबदार मंत्र्यांच्या प्रतिमांना जोडे मारा आंदोलन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"