फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड सांस्कृतिक

पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती स्पर्धेचे प्रदर्शन

पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती स्पर्धेचे प्रदर्शन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील इयत्ता ५ वी १० वी तील विद्यार्थ्यांसाठी ‘पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती व सजावट’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांद्वारे बनविण्यात आलेल्या मूर्तींचे प्रदर्शन चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला शाळा आणि विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या ४१ शाळांतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा पर्यावरण पूरक गणेश मूर्ती आपल्या हातांनी बनवल्या होत्या. तसेच सजावट देखील आकर्षक केली होती. यातून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता आणि कल्पकतेचा परिपाक दिसून आला. काही विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवल्या होत्या तर काहींनी लाकडाचा भुसा, कागदाच्या लगद्यापासून तर अगदी झाडांच्या पानांपासून देखील गणेश मूर्ती बनवल्या होत्या. मूर्ती बनवण्यासाठी नैसर्गिक चिकणमाती, बांबू आणि लाकडाचे तुकडे, उसाच्या काड्या तसेच तुरटीमध्ये मिसळलेल्या चिकणमातीचा वापर केला होता. तर मूर्ती रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला होता. सजावटीसाठी जे साहित्य मुलांनी वापरले होते त्यातही नैसर्गिक फुले, पाने, कागद, धागे, शाश्वत, नैसर्गिकरित्या विघटन होणा-या वस्तू, नालीदार चादरी, कापड, लाकूड, बांबू आदी साहित्याचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीमचे सुंदर सादरीकरण केले. महापालिकेच्या वतीने बक्षीस वितरण कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.

यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे , जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता योगेश आल्हाट यांच्यासह या स्पर्धेत सहभागी शाळांतील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.पर्यावरणास अनुकूल तत्त्वांचे पालन तसेच पर्यावरणावर एकूण परिणाम तत्वावर आधारित इको फ्रेंडली गणेश मूर्त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, अजिंक्य येळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, प्रज्ञा ठाकूर आणि योगेश आल्हाट यांनी केले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"