शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा राजीनामा!

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला अपयश आल्याने या अपयशाची जबाबदारी स्वीकारून शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. एकूण 128 जागांपैकी एकाही जागेवर पक्षाला यश मिळालेले नाही. निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणूक निकाल अपेक्षाप्रमाणे न लागल्यामुळे पक्षाच्या हितासाठी व संघटकनात्मक शिस्त पाळण्यासाठी आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्षाच्या ध्येय धोरणांवर व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर माझी निष्ठा कायम असून भविष्यात पक्षाकडून मला जी जबाबदारी दिली जाईल ती मी प्रामाणिकपणे पार पाटील असे कामठे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

