तळेगाव, चाकण, आळंदी नगरपरिषद मतमोजणीसाठी अंतर्गत रस्त्यावरील वाहतूकीत बदल!

पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी रविवार 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने या भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.

तळेगाव वाहतूक विभाग अंतर्गत
जिजामाता चौकाकडून तळेगाव स्टेशन चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग; जिजामाता चौक -खांडगे पेट्रोल पंप (डावीकडे वळून) बेटी बचाव सर्कल (डावीकडे वळून) राज मेडिकल (उजवीकडे वळून) मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तळेगाव स्टेशन चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग; तळेगाव स्टेशन चौक- बीएसएनएल कॉर्नर (उजवीकडे वळून) मंत्रा सिटी रोडने स्टार- बाजार कॉर्नर (डावीकडे वळून) जुना मुंबई -पुणे महामार्ग लिंब फाटा चौक (डावीकडे वळून) मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. काळोखे वाडीतील नवीन नगर परिषदेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग; काळोखेवाडी वक्रतुंड बंगला कॉर्नर (डावीकडे वळून) आरोग्य आयुर्वेदिक क्लिनिक (उजवीकडे वळून) बेटी बचाव सर्कल (डावीकडे वळून) राज मेडिकल (उजवीकडे वळून) मारुती मंदिर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. आदर्श विद्यालय गेट कडून नवीन तळेगाव नगर परिषदेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे .पर्यायी मार्ग; आदर्श विद्यालय, श्री नगरी कॉर्नर (उजवीकडे वळून) हॉटेल इशा कॉर्नर (डावीकडे वळून) जिजामाता चौक मार्गे अथवा खांडगे पेट्रोल पंप समोरून बेटी बचाव कॉर्नर मार्गे इच्छित स्थळी जातील. वतन नगर बाजू कडून हिंद माता भुयारी मार्गे- काका हलवाई कॉर्नरला येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. यासाठी पर्यायी मार्ग; स्वप्ननगरी जनसेवा वाचनालय (डावीकडे वळून) चाकण- तळेगाव महामार्गाने सिंडिकेट चौक- तळेगाव स्टेशन चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
चाकण वाहतूक विभाग अंतर्गत
चाकण गावठाण, महात्मा फुले चौकाकडून येणाऱ्या वाहनांना मार्केट यार्ड व मार्केट यार्ड चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग : मार्केट यार्ड गेट नंबर दोन समोरील मुक्ताई मंदिरापासून डावीकडे वळून आंबेठाण ब्रिज मार्गे इच्छित स्थळी जातील. खेडबाजार खेड बाजूकडून येणाऱ्या वाहनांना चाकण गावठाण व चाकण शहरात जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग: नाशिक पुणे हायवेने सरळ आंबेठाण ब्रिज आंबेठाण चौकाचे पुढून इच्छित स्थळी जातील
दिघी आळंदी वाहतूक विभाग अंतर्गत
मरकळ गाव बाजू कडून येणाऱ्या वाहनांना मरकळ चौक मार्गे- योगीराज चौक -देहू फाटा चौक पुणे बाजू कडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग; मरकळ चौक -वडगाव चौक- चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. वडगाव घेणंद बाजू कडून वडगाव रोडने आळंदी मरकळ चौक मार्गे पुणे व चाकण बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग: 40 फुटी मार्ग जोग महाराज धर्मशाळा चाकण रोडने इच्छित स्थळी जातील. देहू फाटा चौक ते योगीराज चौक मार्गे आळंदी- चाकण -वडगाव घेणंद कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे .पर्यायी मार्ग; पुणे कडून येणारी वाहने देहू फाटा- योगीराज चौक मार्गे चाकण चौक -40 फुटी रोड मार्गे इच्छित स्थळी जातील. भारत माता चौकाकडून येणारी वाहने देहू फाटा चौक (उजवीकडे वळून) इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग: भारत माता चौक मोशी कडून देहू फाटा चौक योगीराज चौक मार्गे ,चाकण चौक, चाळीस फुटी रोड मार्ग इच्छित स्थळी जातील. विठ्ठल रुक्मिणी मंदिर आळंदी पो. स्टेशन मार्गे नगरपरिषद चौक जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग: दत्त मंदिर कॉर्नर चौक, गणपती मंदिर चौक ,वृंदावन कॉलनी, केके हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील. पर्यायी मार्ग मरकळ चौक, वडगाव मार्गे इच्छित स्थळी जातील .वडगाव चौक हजेरी मारुती मंदिराकडून नगरपरिषद चौकाकडे सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग: वडगाव चौक, चाकण चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. रमेश टी गणेश दरवाजाकडून नगरपरिषद चौकाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग: रमेश टी, फ्रुटवाले धर्मशाळा गल्ली, चावडी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
तळेगाव, चाकण, आळंदी या मार्गावरील वाहतूक 21 डिसेंबर रोजी पहाटे ते 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत अथवा मतमोजणी समाप्त होईपर्यंत बंदी असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना यातून वगळण्यात आले आहे असे वाहतूक शाखेने कळवले आहे.

