जाती नुसार जन गणना धोरण;पंतप्रधान मोदींचे आभार!

केंद्र सरकारच्या जातीय जनगणना निर्णयाचे लाडू वाटून स्वागत
पिंपरी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत आकुर्डी संभाजीनगर शाहूनगर मंडलाने केले आहे. नागरिकांना लाडू भरवून या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा केला.
मोहननगर कमानी शेजारील (प्रभाग क्रमांक १४) चौकात महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम राबविला.

आमदार अमित गोरखे म्हणाले, या निर्णयाचे भविष्यात नागरिकांना फायदे होणार आहे. देशाच्या पंतप्रधानांचा अभिमान वाटत आहे. धाडसी निर्णय केवळ आणि केवळ एनडीए सरकारच घेऊ शकते.’
यावेळी कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, श्री कैलास कुटे, सौ मनिषा शिंदे, चंद्रकांत शिंदे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, राकेश ठाकूर उपस्थित होते.