वाकड स्टार बाजारातून वस्तू चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल!

पिंपरी : स्टार बाजारच्या दोन शाखांमध्ये घुसून नामांकित ब्रँडचे तूप, बदाम, काजू व अन्य खाद्य वस्तू चोरणाऱ्या सात जणांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार 29 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दत्त मंदिर रोड, वाकड आणि 12 ऑगस्ट रोजी कलाटे वस्ती येथील स्टार बाजार मध्ये घडली.
या प्रकरणी सचिन पंडित वाघमारे (वय 39, रा. थिटे नगर, खराडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रिक्षातून आलेल्या चार अनोळखी महिला व तीन पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऑटोरिक्षातून स्टार बाजार मध्ये आले. आरोपींनी गोवर्धन तूप, बदाम, काजू व अन्य वस्तू असा एकूण 42 हजार 100 रुपये किंमतीचा माल चोरून नेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत. वाकड स्टार बाजारातून वस्तू चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल

गांजा विक्री प्रकरणी अटक!
पिंपरी : बेकायदेशीरपणे गांजा बाळगून त्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई शनिवार 29 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या सुमारास काळभोर गोठा ते संजय हॉटेलच्या दरम्यान गल्लीतील निगडी येथे करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस शिपाई दीपक तांदळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुमार नंदकिशोर चौधरी (वय 27, सध्या रा. रावेत, मूळ रा. गोपालपूर, ता. काराकाट, जि. रोहतास, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने विक्रीसाठी तीन हजार नऊशे पन्नास रुपये किंमतीचा गांजा जवळ बाळगला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

