Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

3rd October 2026
गुन्हेगारी

बुलेट दुचाकीस्वराची ऑटो रिक्षास जोरदार धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू!

बुलेट दुचाकीस्वराची ऑटो रिक्षास जोरदार धडक; रिक्षाचालकाचा मृत्यू!

पिंपरी : भरधाव वेगाने बुलेट दुचाकी चालवून ऑटो रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालक गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. ही घटना गुरुवार 24 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास न्यू बीआरटी रोड शेजारी रावेत येथे घडली.

याप्रकरणी एका महिलने (वय 40, रा. मंगलमूर्ती सोसायटी प्रवीण खानतोडे यांचे खोलीत भाड्याने ,आदर्श हाऊसिंग सोसायटी त्रिवेणी नगर, मुळगाव- रसूलाबाद, ता. आर्वी, जि. वर्धा ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिन्मय महेश बरीदे (वय 20, रा.नंदन प्रेसपेरो गोल्ड सोसायटी, बी -तीन ,1304, बाणेर, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने त्याच्या ताब्यातील बुलेट दुचाकी नंबर (एमएच 14 /एमपी /3555) ही बुलेट दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीचे पती अनिल श्रीपतराव तांबे हे चालवीत असलेल्या ऑटो रिक्षा क्रमांक (एमएच 14, जेपी/15 46) हीस पाठीमागून येऊन जोरात धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन फिर्यादीचे पतीस छातीस ,डोक्यात, चेहऱ्यावर, कमरेस गंभीर दुखापत करून त्यांचे मृत्यू कारणीभूत झाला. ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रावेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस कुंभार हे तपास करीत आहेत.

indra dairy
indra dairy

इंस्टाग्राम अकाउंट धारकाने महिलेची 8 लाख रुपयांची केली फसवणूक!
पिंपरी : इंस्टाग्राम अकाउंटवर एका महिलेची ओळख करून त्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन ज्यादा पैशाचे अमीष दाखवून विश्वास संपादन केला. भावनिक बोलून प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून महिलेस 8 लाख 14 हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून त्यांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक केली. ही घटना 27 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत भारत कॉलनी, नढे नगर, काळेवाडी येथे घडली.

एका 34 वर्षीय महिलेने (भारत कॉलनी, नढे नगर, काळेवाडी) काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंस्टाग्राम आयडी अकाउंट धारक साहिल वर्मा, मोबाईल धारक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची इंस्टाग्राम अकाउंट वरून आरोपीशी ओळख झाली. आरोपीने महिलेच्या साधेपणाचा फायदा घेऊन, तुझ्याशी लग्न करण्याचे आणि जास्त पैशाचे आमीष दाखवून बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. भावनिक बोलून प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून फिर्यादीला आमिष दाखवून 8 लाख 14 हजार रुपये त्यांना पाठवण्यास भाग पाडले. त्यांची ऑनलाइन माध्यमातून फसवणूक करण्यात आली. काळेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव, पोलीस निरीक्षक धुमाळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"