फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

श्री क्षेत्र आळंदीत भाजपाचा महाविजय; नगराध्यक्षांसह २१ पैकी १५ जागांवर वर्चस्व!

श्री क्षेत्र आळंदीत भाजपाचा महाविजय; नगराध्यक्षांसह २१ पैकी १५ जागांवर वर्चस्व!

पुणे ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचे फुलले ‘कमळ’
पिंपरी :  श्री क्षेत्र आळंदी नगरपरिषदेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत २१ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच नगराध्यक्षपदी प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांनी बहुमताने विजय मिळवला, हा भाजपासाठी ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

viara vcc
viara vcc

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने दिमाखदार यश संपादन करत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या महायुतीने राज्यभर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

राज्यातील २८८ नगरपरिषदांपैकी २१४ हून अधिक नगराध्यक्ष पदांवर भाजपाच्या महायुतीने विजय मिळवला असून, भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या यशाबद्दल पिंपरी-चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

‘‘विकासाभिमुख हिंदुत्व’’ या भूमिकेला मतदारांनी दिलेला स्पष्ट कौल भाजपाच्या धोरणांवरील विश्वास दर्शवतो . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीत मिळालेला हा विजय भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांना समर्पित असल्याचे  भाजपा आमदार  महेश लांडगे त्यांनी सांगितले. आळंदीतील या महाविजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही होईल, असा ठाम विश्वास आमदार लांडगे यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी राज्यातील सर्व विजयी उमेदवारांचे पुन्हा एकदा अभिनंदन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"