फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

भाजपाचा राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का!

भाजपाचा राष्ट्रवादीला शहरात आणखी एक धक्का!

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पक्षबदलाचे पेव
पिंपरी : शहरात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रवेश-प्रतिप्रवेशाच्या राजकारणाला वेग आला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जोरदार राजकीय पलटवार केला आहे. आकुर्डी- काळभोरनगर प्रभागातील शेट्टी कुटुंबियांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि भाजपात प्रवेश केला आहे.

viara vcc
viara vcc

शहरातील हॉटेल व्यावसायिक संघटना आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुटुंबाने दोन-चार टर्म नगरसेवक तथा महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. उल्लास शेट्टी, प्रसाद शेट्टी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. शेट्टी यांचे बंधू जगदीश शेट्टी हे राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.

तसेच, दिवंगत खासदार गजानन बाबर यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, माजी नगरसेविका शारदा बाबर, अमित प्रकाश बाबर, एैश्वर्या बाबर यांनीही भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. अमित बाबर हे माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांचे सुपुत्र असून सांगली–सातारा–कोल्हापूर मित्र मंडळाचे ते सक्रिय सदस्य म्हणून परिचित आहेत. सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय राहिला आहे.

माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, प्रसाद शेट्टी, अनुराधा गोफणे, सामाजिक कार्यकर्ते देवीदास गोफणे, अमित बाबर आणि महेश सहकारी बँकेचे अजय लढ्ढा, महेश काटे, संजय जगताप, लवकुश यादव, चेतन शेटे, गणेश कंकावणे, ऋिषी शेट्टी यांच्या प्रवेशामुळे भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, दक्षिण भारत आघाडीचे प्रमुख राजेश पिल्ले, सरचिटणीस शितल शिंदे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, राजु मिसाळ, प्रशांत शितोळे, शांतराम बापू भालेकर, राजु दुर्गे आदी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"