Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

थेरगाव करसंकलन कार्यालयात बँकेच्या रोखपालांनी केला बनावट पावत्याद्वारेअपहार!

थेरगाव करसंकलन कार्यालयात बँकेच्या रोखपालांनी केला बनावट पावत्याद्वारेअपहार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव करसंकलन कार्यालयात बँक ऑफ महाराष्ट्राच्या पिंपरी शाखेने नेमलेल्या दोन रोखपाल कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर बिल भरलेच्या बनावट पावत्या नागरिकांना देऊन अपहार केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र बँकेचे रोखपाल प्रसाद कुंभार आणि आदित्य गोलांडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

महापालिकेच्या 16 कर संकलन विभागाकडून मालमत्ता धारकांकडून मालमत्ता कर स्वीकारला जातो. मालमत्ता कराचे संकलन बँक ऑफ महाराष्ट्रकडून केले जाते. विभागीय कार्यालयात महाराष्ट्र बँकेचे रोखपाल नेमले आहेत. थेरगाव कार्यालयात सरोजिनी क्षिरसागर यांचे 33 हजार पाचशे रुपयांचा मालमत्ताकराचे समायोजन झाले आहे मात्र रोखपाल कुंभार आणि गोलांडे यांनी त्यांच्याकडून 33 हजार पाचशे रुपये रोखीने घेऊन बनावट पावती 24 जून 2026 रोजी दिली आहे. तसेच गोविंद धनवडे यांच्या 6350 रुपयांच्या मालमत्ता कराचे समायोजन करण्यात आले. मात्र त्यांच्याकडून सहा हजार तीनशे पन्नास रुपये रोखीने घेऊन त्यांना 3 फेब्रुवारी 2024 ची बनावट पावती देण्यात आली आहे. त्या रकमेचा त्यांनी आर्थिक अपहार केला आहे.

महापालिका कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली आहे. रोखपाल कुंभार आणि गोलांडे यांच्यावर त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"