योगा स्पर्धेचे विजेतेपद बजाज ऑटो व उपविजेतेपद टाटा मोटर्सने पटकावले!

औद्योगिक क्रीडा संघटनेची ६२ वी योगा स्पर्धा
पिंपरी : योगामुळे शरीर व मन निरोगी राहते.याचा दीर्घकाळ फायदा आपणास होतो. योगाची स्पर्धा पाहून मला अतिशय आनंद झाला असे मत बजाज ऑटो आरएनडीचे व्हाईस प्रेसिडेंट सेंथिलकुमार मणी यांनी व्यक्त केले.त्यांचे हस्ते औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या योगा स्पर्धाचे पारितोषीक वितरण विजेते बजाज ऑटो आकुर्डी व उपविजेतेपद टाटा मोटर्स यांना करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

बजाज ऑटो आकुर्डी येथे उत्साह हॉलमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये टाटा मोटर्स,प्रीमियम ट्रान्समिशन,फोर्स मोटर्स,टीकेआयएल,बजाज ऑटो आकुर्डी,एसकेएफ,सँडविक एशिया,५१२ आर्मी बेस,टीएमव्ही,सॉफ्टकॉन सिस्टिम्स,जेसीबी,पदमजी पेपर मिल,इन्फोसिस,वोडाफोन क्लेनेक्सझेल लाइफ सायन्स,ऑर्डिनन्स फॅक्टरी देहू रोड अशा एकूण २० कंपन्यांच्या ८० खेळाडूंनी भाग घेतला. एकूण ७ गटामधे (पुरुष व महिला) गटांमध्ये झाली.
पारितोषक वितरणाच्या वेळेस नितीन कदम व योगेश तळेकर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषण केले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण सेंथिलकुमार मणी,नितीन कदम,योगेश तळेकर,शशिकांत कात्रे,राजू नातू,गिरीश गायकवाड,दुष्यंत गायकवाड यांच्या हस्ते झाले. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अतुल काळोखे (बजाज ऑटो आकुर्डी),औद्योगिक क्रीडा संघटनेचे वसंत ठोंबरे,नरेंद्र कदम,प्रदीप वाघ,हरी देशपांडे,विजय हिंगे, यांनी केले या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटचे मोलाचे साह्य लाभले.
या स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय योगा खेळाडू चंद्रकांत पांगारे,स्पर्धेचे पंच व या स्पर्धेतील वरिष्ठ खेळाडू यांच्या हस्ते झाले.यावेळी अतुल काळोखे (बजाज ऑटो),सचिन कांबळे(जेसीबी),औद्योगिक क्रीडा संघटनेचे सचिव वसंत ठोंबरे,स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे,खजिनदार प्रदीप वाघ, अमित कदम,संतोष शिंदे (एसकेएफ), नितीन कदम(टाटा मोटर्स), गिरीश गायकवाड (थरमॅक्स) सुयोग फुलबडवे( सिग्मा इलेक्ट्रिकल्स) दुष्यंत गायकवाड (सँडविक एशिया) मंदार कुलकर्णी टाटा मोटर्स स्पोर्ट्स कमिटीचे शशिकांत कात्रे, राजू नातू,सुदर्शन आहेर हे उपस्थित होते.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन चंद्रकांत पांगारे,प्रास्ताविक सचिव वसंत ठोंबरे व आभार प्रदर्शन प्रदीप वाघ यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अतुल काळोखे (बजाज ऑटो आकुर्डी),औद्योगिक क्रीडा संघटनेचे वसंत ठोंबरे,नरेंद्र कदम,प्रदीप वाघ,हरी देशपांडे,विजय हिंगे, यांनी केले या स्पर्धेच्या आयोजनासाठी पुणे डिस्ट्रिक्ट योगा अँड फिटनेस इन्स्टिट्यूटचे मोलाचे साह्य लाभले.
स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१) १८ ते ३०वर्षे महिला गट:-१)जुई चंद्रकांत पांगारे ७७.७५गुण,२)ऋतुजा पाटील ७७.२५गुण,३)शितल गोरे ७१.२५गुण(सर्व बजाज ऑटो)
२) ३१ ते ४०वर्षे महिला गट:-१)योगिता महाडिक(क्लेनेक्सझेल लाइफ सायन्स)८४.५गुण,२)प्राजक्ता कानडे,(वोडाफोन)७७गुण,३)अश्विनी तेलेकोणे ६६गुण
३) १८ ते ३०वर्षे पुरुष गट:-१)विपुल भोसले(बजाज ऑटो)७७.७५गुण,२)अंकित गौतम(टाटा मोटर्स)७२.५गुण,३)कुणाल शेटकर(टाटा मोटर्स)६९.५ गुण
४) ३१ ते ४०वर्षे पुरुष गट:-१)प्रमोद उगले(बजाज ऑटो)१६२गुण,२)समीर मस्के(सँडविक एशिया)१४९ गुण,३)सचिन पोकळे(फोर्स मोटर्स)१३४गुण
५) ४०ते ५०वर्षे पुरुष गट:-१)अभिजीत लोखंडे(टाटा मोटर्स)७१.५ गुण,२)हनुमंत गोरनाळे(सँडविक एशिया)७०.५ गुण,३)सावन केदार(बजाज ऑटो)७० गुण
६) ५०-६० वर्षे पुरुष गट:-१)एम.बी.वाळुंज(टाटा मोटर्स)७७गुण,२)सुभाष शिंगोटे(बजाज ऑटो)७७ गुण,३)हेमंत पवार(टाटा मोटर्स)७२.५गुण
७) ६० वर्षे पेक्षा अधिक पुरुष गट:-१)चंद्रकांत पांगारे(बजाज ऑटो)१७५ गुण,२)गोविंद शिरोळे(बजाज ऑटो)१५६ गुण

