Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

रिक्षा चालकाला मारहाण; गुन्हा दाखल!

रिक्षा चालकाला मारहाण; गुन्हा दाखल!

पिंपरी : रिक्षा चालविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात दोघाजणांनी रिक्षा चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. हातातील मनगटी कड्याने मारल्याने रिक्षा चालकाच्या डाव्या डोळ्याच्या पापणीला दुखापत झाली. बालाजी नगर, मेदनकरवाडी येथील अल्क लाईन कॉलनी समोर ही घटना घडली.

याप्रकरणी मधुकर केरबा पुरी गोसावी (वय 59, बालाजी नगर, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवींद्र सुरेश शिंदे , अरविंद शंकर शिंदे (दोघे रा. वैद वस्ती, मेदनकरवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीला रिक्षा व्यवस्थित चालवता येत नाही का असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर एका आरोपीने फिर्यादीच्या डाव्या गालावर हाताने तसेच हातातील मनगटी कड्याने जोरात मारले. त्यामुळे फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीला दुखापत झाली. चाकण पोलीस तपास करत आहेत. रिक्षा चालकाला मारहाण गुन्हा दाखल

viara vcc
viara vcc

ट्रान्सफॉर्मरची कॉपर केबल चोरीला!
पिंपरी : कंपनीच्या आवारातील ट्रान्सफॉर्मरची वीस मीटर लांबीची कॉपर अर्थिंग केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. जाधववाडी मावळ येथील हायस्कूल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये 5 सप्टेंबर रोजी ही चोरी झाली.

या प्रकरणी ऋतुराज भरत ढोकणे (वय 27, वराळे फाटा, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मरची चाळीस हजार रुपये किंमतीची 20 मीटर लांबीची कॉपर आर्थीन केबल चोरून नेली. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"