Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

11th September 2026
गुन्हेगारी

बनावट कागदपत्राद्वारे कंपनीच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न!

बनावट कागदपत्राद्वारे कंपनीच्या जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न!

पिंपरी : बनावट ठराव आणि संमती पत्र तयार करून न्यायालयाची दिशाभूल करत पीएमटी मशीन कंपनीच्या पुणे आणि वांद्रे येथील महागड्या जागांवर हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 28 जून 2023 ते 1 सप्टेंबर 2026 या कालावधीत पीएमटी मशीन्स लिमिटेड कंपनी कार्यालय पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी तनिष सौरभ बोरा (वय 24, मुंबई) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोनिका शहा (रा.जूहू, मुंबई), शशी पॉल लखवारा (रा. मुंबई), अनिल गुप्ता (वरळी, मुंबई), अनिश गुप्ता (रा.वरळी, मुंबई), विनीत रमेश आशर (रा.सायन मुंबई) आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून पीएमटी मशीनच्या जमीन आणि फ्लॅटच्या विक्रीचा बनावट समजुतीचा करारनामा तयार केला. तसेच शशी पॉल लकवारा याला निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचा बनावट ठराव तयार करून या कागदपत्राच्या आधारे न्यायालयात संमती पत्र सादर केले.

अँकर पॉईंट कंपनीला पीएमटी मशीन्स कंपनीच्या पुणे आणि वांद्रे येथील जमिनीवर हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

घरफोडीत दोन लाखाचा मुद्देमाल चोरीला; एकास अटक!
पिंपरी : घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही असा एक लाख नव्वद हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना चऱ्होली खुर्द येथे घडली. शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट पहाटे साडेचार ते सोमवार दिनांक 31 सकाळी आठच्या दरम्यान पद्यदर्शन पार्क, पद्मावती मंदिराच्या पाठीमागे ही घटना घडली.

याप्रकरणी संग्राम उज्जैन देवकर (वय 26, आळंदी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रणजीत अशोक भिसे (वय 31, चऱ्होली खुर्द) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने फिर्यादीच्या घराबाहेरचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तसेच आतील दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि हायर कंपनीचा एलईडी टीव्ही असा एक लाख 90 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"