Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; चौघांना अटक!

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मारहाण; चौघांना अटक!

पिंपरी : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून सात जणांनी एका तरुणास लाथा बुक्क्यांनी तसेच फावडे, दगड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना 18 ऑगस्ट रोजी ग्लोबल वाईन्स थरमॅक्स चौक ,चिंचवड, माता रमाबाई भिमराव आंबेडकर प्राथमिक शाळेच्या समोर अजंठा नगर, चिंचवड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी गणेश बापू इंगळे (वय 27, रा रमाबाई भिमराव आंबेडकर प्राथमिक शाळेच्या समोर, बी पत्रा शेड ,अजंठा नगर चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. लखन संजय सुतार (वय 29), प्रकाश पोळ (वय 28), नितीन साबळे (वय 32), सचिन भागवत (वय 25, सर्व रा. अजंठा नगर, चिंचवड) व अन्य अनोळखी तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक ते चार क्रमांकाचे आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते पाच यांनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले .परंतु फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी तसेच फावडे, दगड व लाकडी दांडक्याने पायावर व पाठीवर मारहाण करीत जखमी केले. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व आडेकर हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"