गव्हाणेंच्या प्रचारात व्यापाऱ्यांचा मतदानाचा निर्धार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा, परिसरात शांतता, महिलांना सुरक्षा या मुद्द्यावर चक्रपाणी वसाहत, लांडगे वस्ती, राधाकृष्ण नगर तसेच चक्रपाणी वसाहतीतील नागरिकांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जास्तीत जास्त लीड देऊन विजयी करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणार असून शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल प्रचंड वाढले असून , राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा एकच जयघोष पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राधाकृष्ण नगर, चक्रपाणि वसाहत, महादेव नगर तसेच लांडगे वस्ती परिसरामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या यादरम्यान पदयात्रा काढण्यात आली. नागरिकांशी संवाद साधत गव्हाणे यांनी आगामी काळात नागरिकांना या परिसरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण पाहायला मिळेल असे सांगितले.
गव्हाणे यांनी शुक्रवारी टाटा मोटर्स कंपनीच्या बाहेर कामगारांशी संवाद साधला. कामगारांची भेट घेऊन आगामी काळात त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले या औद्योगिक नगरीसाठी शरद पवार यांनी केलेले काम आम्ही विसरलेलो नाही.त्यांच्या माध्यमातूनच येथील कारखानदारीला बळ मिळू शकते याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे.त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या पाठीशी कामगार खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.