फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

मत द्या.. वृक्षसंवर्धन करा..

मत द्या.. वृक्षसंवर्धन करा..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मतदान केल्यानंतर सर्वसाधारणपणे बोटावर शाई तर लावली जातेच पण पिंपरी-चिंचवडमध्ये काही मतदान केंद्रांवर हातात एक तुळशीचं रोपही दिलं जातं. मतदान केल्यानंतर बाहेर ठेवलेल्या सेल्फी पॉइंटवर ते रोप दाखवून प्रत्येक जण मतदानाचे आवाहन करतो आहे, आणि महापालिकेच्या या उपक्रमाचे कौतुकही करतो आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील या चित्राचे शहरातील सर्वच नागरिकांनी कौतुक केले आहे.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित मतदान केंद्राचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला शहरवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

काय आहे हरित मतदान केंद्र?
पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ५ अशा एकूण १५ मतदान केंद्रांवर महापालिकेच्या वतीने “हरित मतदान केंद्र” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या मतदान केंद्रांवर खास मतदारांसाठी विविध पाम प्रजाती, शोभिवंत झाडे, फळझाडे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती अशा विविध वनस्पतींचे माहिती प्रदर्शन भरविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

मतदान केंद्राबाहेर सेल्फि पॉइन्ट्स
आज आहे मतदानाचा सण.. चला करूया वृक्षसंवर्धन.., बोटावर दिसते शाई लय भारी.. वृक्ष रक्षणाची माझी जबाबदारी.. अशा वैविध्यपूर्ण बोधवाक्यांचे सेल्फी पॉइन्ट्स महापालिकेने तयार केले आहेत. या सेल्फि पॉन्टवर येऊन मतदार तुळशीचे रोप दाखवून मतदान करण्याचे आवाहन करतात आणि महापालिकेच्या या हरित केंद्राचे कौतुकही करत आहेत.

हे ही वाचा : १५ मतदान केंद्रांवर महापालिका भरवणार विविध वनस्पतींचे माहिती प्रदर्शन!

https://tothepoints.org/municipal-corporation-will-organize-information-display-of-various-plants-at-15-green-polling-stations/

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"