फक्त मुद्द्याचं!

5th June 2026
पिंपरी-चिंचवड

रहाटणी, गंगानगर गावठाण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

रहाटणी, गंगानगर गावठाण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. २७, मौजे रहाटणी येथील गंगानगर, रहाटणी गावठाण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

viara vcc
viara vcc

या कारवाई दरम्यान एकूण ३ ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली असून, त्यांचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ३,२१९.४५ चौ. मी. इतके आहे. ही कारवाई आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या अधिपत्याखाली पार पाडण्यात आली.

कारवाईमध्ये उपअभियंता सुनील बेळगावकर, जयवंत रोकडे, प्रताप मोरे तसेच महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील (अ, ब, ड व ग) एकूण १५ बीट निरीक्षक, ४० एम.एस.एफ. जवान, ०१ पोलीस उपनिरीक्षक, ०५ पोलीस कर्मचारी आणि १ जेसीबी मशीन यांच्या साहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली. यासोबतच विद्युत विभाग व इतर संबंधित विभागांचे सहकार्य घेऊन ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर यापुढेही नियमानुसार सातत्याने निष्कासन कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"