फक्त मुद्द्याचं!

19th April 2026
गुन्हेगारी

प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या फरार प्रियकरास अटक!

प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलाचा खून करणाऱ्या फरार प्रियकरास अटक!

पिंपरी : प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पोटच्या सहा वर्षाच्या मुलाला आईने तिच्या प्रियकरा सोबत कट रचून ठार केले. या गुन्ह्यात आरोपी असलेला फरार प्रियकर राम विनायक कजेवाडी (रा. कुरुळी, ता.खेड मूळ-रा.पूस,ता.अंबाजोगाई,जि.बीड) याला दक्षिण माळुंगे पोलिसांनी आंध्र प्रदेश आणि अंबाजोगाई येथे पाठलाग करून शुक्रवार 17 एप्रिल रोजी अटक केली.

vcc aksyay trutiya
vcc aksyay trutiya

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियकर आणि खून झालेल्या सहा वर्षाच्या मुलाची आई यांनी शनिवार दिनांक 4 एप्रिल रात्री साडे अकराच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहती वसाहती मधील (कुरुळी, ता. खेड) येथे सहा वर्षाच्या बालकाची निर्घुण हत्या केली होती. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा बनाव त्यांनी केला. अवेज महबूब शेख (वय सहा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक शेख (वय 49,मूळ-रा.आंबेजोगाई) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी बसरीत मेहबूब शेख (वय 27,रा.मु.पो.पूस,ता.अंबाजोगाई ,जि. बीड) हिला अटक केली असून तिचा प्रियकर राम विनायक कजेवाड (रा.कुरुळी,ता.खेड,मूळ-रा.पूस,ता.आंबेजोगाई,जि.बीड) त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तो फरार होता. बसरीन शेख आणि राम कजेवाड यांचे प्रेम संबंध होते त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय आवेज हा अडथळा ठरत होता त्यामुळे दोघांनी त्याला बाथरूम मध्ये नेले त्याचे डोके बादलीत बादलीतील पाण्यात बुडवून ठार केले. त्यानंतर मृतदेह (धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड )येथे नेऊन त्याचा मृत्यू उदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचा बनाव केला.

मात्र यामध्ये नातेवाईकांना संशय आला नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनात धक्कादायक माहिती समोर आली. अवेज याचा मृत्यू हृदयाच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडवून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अवेजच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरा सोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबूल केले. परळी ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिला. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. त्यानुसार फरार आरोपीच्या तपास घेत असताना तिरुपती आंध्र प्रदेश आणि बीड या ठिकाणी त्याचा पाठलाग करून आरोपीस अटक केली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"