फक्त मुद्द्याचं!

24th March 2026
पिंपरी-चिंचवड

पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक लढण्याचा ‘आप’च्या बैठकीत ठराव!

पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक लढण्याचा ‘आप’च्या बैठकीत ठराव!

विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली ताकदीनिशी लढविणार
पिंपरी :महाराष्ट्र राज्यात आगामी होणाऱ्या सर्व महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे. त्याची सुरुवात म्हणून तयारी महापालिकेची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आगामी महापालिका निवडणुक, पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनिशी लढविण्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागांमध्ये सक्षम उमेदवार उभे करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

आम आदमी पार्टीच्या राज्य समिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांची बैठक कोरेगाव पार्क येथील अबुल कलाम हॉल येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला आम आदमी पार्टीचे राज्य समिती कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, उपाध्यक्ष विजय कुंभार, सचिव डॉ अभिजीत मोरे, राज्य प्रवक्ते श्री मुकुंद किर्दत, उपस्थित होते. तसेच पुणे शहराध्यक्ष धनंजय बेनकर, पुणे शहर प्रवक्ता किरण कद्रे, युवक अध्यक्ष अमित मस्के, रविराज काळे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"