फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक!

भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक!

पिंपरी : चाकण-तळेगाव रस्त्यावर भरधाव कंटेनरने चार वाहनांना धडक दिली. ही घटना सोमवारी (२९ डिसेंबर) रोजी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास घडली.

कंटेनरवरील अज्ञात चालकाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. प्रथम महादेव बगदुरे (वय २७, रा. महाळुंगे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (३० डिसेंबर) उत्‍तर महाळुंगे पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोटारसायकलवरून जात असताना मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेत एकूण चार वाहनांना धडक दिली असून संबंधित वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत. तसेच त्‍यांच्‍या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

viara vcc
viara vcc

८१८ ग्रॅम गांजासह तरुणास अटक!
पिंपरी : भोसरी परिसरात नाल्याजवळ गांजा बाळगून विक्रीसाठी फिरताना पोलिसांनी एका तरुणास अटक केली. ही कारवाई सोमवारी (२९ डिसेंबर) रोजी रात्री सव्‍वा अकरा वाजताच्‍या सुमारास इंद्रायणीनगर, भोसरी येथे करण्‍यात आली.

अक्षय रामभाऊ माने (वय २५, रा. सदगुरुनगर, भोसरी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलिस अंमलदार महादेव गुलाब गारोळे यांनी भोसरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून एक लाख ४२ हजार रुपये किंमतीचा ८१८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याचे आढळले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"