फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
गुन्हेगारी

चालकाने केला मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा अपहार!

चालकाने केला मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा अपहार!

पिंपरी : मारुती सुझुकी स्विफ्ट गाडीवर सीएनजी किट बसवल्याची नोंद आरटीओ मध्ये करून आणतो म्हणून फिर्यादीच्या गाडीवरील ड्रायव्हरने आरसी बुक, एसबीआय बँकेचा चेक, पॅन कार्ड, आधार कार्ड असे कागदपत्र घेऊन आणि आरटीओ येथील फॉर्मवर सही घेऊन फसवणूक केली. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फ्लॅट नंबर ए /वन 105, विजन रिजन सोसायटी, डुडुळगाव, ता. हवेली येथे घडली.

याबाबत दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सायसराव भागवत जाधवर (वय 50, रा. फ्लॅट नंबर ए- वन 105, विजन रिजन सोसायटी, डुडुळगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आदित्य सिताराम यादव (रा सर्वे नंबर 111, सुतार वाडा, पौड रोड, कोथरूड) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या मारुती सुझुकी कंपनीची गाडी क्रमांक एम एच 14 के एस/ 47 91 या गाडीवर सीएनजी किट बसवले आहे .त्याची नोंद आरटीओ मध्ये करणे आवश्यक असते. त्यानुसार फिर्यादीची तोंड ओळख असलेल्या ड्रायव्हरने सीएनजी किटची आरटीओ मध्ये नोंद करून आणतो असे सांगून गाडीचे आरसी बुक ,एसबीआय बँकेचा चेक, पॅन कार्ड ,आधार कार्ड असे कागदपत्र घेऊन आणि आरटीओ येथील फॉर्म वर सही घेऊन गाडी घेऊन फरार झाला. फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगताप हे पुढील तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

1 लाख 42 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त!
पिंपरी: अवैधरित्या अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवार 29 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांच्या सुमारास भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लक्ष्मी रोडवर असलेल्या नाल्यावर, सीएनजी पेट्रोल पंप जवळ इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

या प्रकरणी महादेव गुलाब गारोळे पोलीस शिपाई, भोसरी पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे .अक्षय रामभाऊ माने (वय 25, राकेश लांडगे चाळ सदगुरूनगर, भोसरी, मूळ पत्ता, डुडुळगाव फाटा, पुणेरी स्वीट जवळ, आळंदी) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय माने याने 1 लाख 42 हजार रुपये किमतीचा 818 ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या विक्री साठी जवळ बाळगला. हा गांजा जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"