Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

16th September 2026
पिंपरी-चिंचवड

शिवजयंतीनिमित्त वाचन उपक्रम साजरा

शिवजयंतीनिमित्त वाचन उपक्रम साजरा

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : सखी राज्ञी जयती संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी वाचन सप्ताह साजरा करून संस्थेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.

इयत्ता पहिली ते नववी या गटातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी क्रांतिकारक, ऐतिहासिक, समाजसुधाराक आणि संतांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली. वाचन सप्ताहाच्या उपक्रमात मनोरम प्राथमिक शाळा, डी आय सी किड्स वर्ल्ड, कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय, क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका विद्यालय, क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर व शिव क्लासेस या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी वाचन उपक्रमात उत्साहाने भाग घेतला. वाचन संस्कृती जपण्यासाठी आणि मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी शिवजयंती कार्यक्रमाअंतर्गत संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

सालाबादप्रमाणे संस्थेच्या वतीने सोरखाडे कुटी, तालेरा हॉस्पिटल येथे शिवजयंती निमित्त शिवप्रतिमेचे पूजन उद्या (१९ फेब्रुवारी) होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापिता अॅड. ज्योती सोरखाडे यांनी दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"