फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी पिंपरी-चिंचवड

पतीने मोबाईल घेतला नाही; पत्नीचा गळफास

पतीने मोबाईल घेतला नाही; पत्नीचा गळफास

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आपण आजूबाजूला घडताना बघतच असतो. पण पतीने मोबाईल खरेदी करून दिला नाही म्हणून पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड परिसरात घडली आहे.

शिवानी गोपाल शर्मा (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड परिसरात बुधवारी ही घटना घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी ही गेल्या काही दिवसांपासून पती गोपाल शर्मा यांच्याकडे मोबाइलसाठी हट्ट करत होती. शिवानी यांचा पती गोपाल हा एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो. कमी वेतनामुळे त्याला आर्थिक चणचण भासत होती. तरीही आपल्या पत्नीला मोबाइल हवा यासाठी त्याची पैशांची जुळवाजुळव देखील सुरू होती. मात्र तरी देखील काही दिवसांपासून मोबाइल घेणे शक्य झाले नाही.

शिवानी दिवसभर घरी एकटीच असल्याने तिला मोबाइल हवा होता. मात्र पतीकडून दिला मोबाईल दिला न गेल्याने तिने पती कामाला गेल्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी पती कामावरून घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"