फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये भव्य 70 फुटी ‘रावण दहन’!

पिंपळे सौदागरमध्ये भव्य 70 फुटी ‘रावण दहन’!

शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन आयोजित ‘रावण दहन’
पिंपरी : आपल्या प्राचीन परंपरेचे स्मरण करत आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्यानिमित्त, पिंपळे सौदागर येथे नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘रावण दहन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रचंड उत्साहात संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष (जिल्हा)शत्रुघ्न सिताराम काटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ‘महाराष्ट्रातील सर्वात मोठा’ रावण दहन सोहळ्याला पिंपरी- चिंचवडसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

श्री शत्रुघ्न काटे यांनी या कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत आमदार स्व.लक्ष्मणभाऊ जगताप यांना स्मरण करून केला गेला.
या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत संपर्क प्रमुख मिलिंदजी देशपांडे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह नरेंद्रजी पेंडसे, मा.खासदार श्री अमरजी साबळे,आमदार महेशदादा लांडगे,आमदार शंकरशेठ जगताप, आमदार अमितदादा गोरखे,मा. आमदार अश्विनीताई जगताप, पवना सह बँक व्हा.चेअरमन जयनाथशेठ काटे यांच्यासह नगरसेवक – नगरसेविका, पदाधिकारी तसेच राजकीय,सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व पिंपळे सौदागर परिसरातील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विविध सांस्कृतिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी झाली. कुणाल मोरे यांच्या डान्स फ्लोर स्टुडिओच्या ग्रुपने विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करत उपस्थितांना थिरकवले. तसेच, कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेले सुनील अनिल तिलकधारी, हिसार (हरियाणा) यांनी साकारलेले हनुमान पात्र तसेच त्यांच्या टीम मार्फत महाकाल यांच्यावर आधारित नृत्य लक्षवेधी ठरले.

या सोहळ्याला नामवंत कलावंतांची विशेष उपस्थिती लाभली. यामध्ये लोकप्रिय गायक अवधूत गांधी, मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर,”मना” चे श्लोक चित्रपट फेम अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तारिणी सिरीयल फेम अभिनेत्री अभिज्ञा भावे यांचा समावेश होता. या कलाकारांचे विशेष सादरीकरण उपस्थितांसाठी पर्वणी ठरले.

“अहंकार, द्वेष, मत्सर आणि सामाजिक विषमता यांसारख्या वाईट प्रवृत्तींचा त्याग करून बंधुभाव आणि विधायकतेला महत्त्व द्यावे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. तरुणांनी व्यसनाधीनता सोडून विधायक कामांमध्ये सक्रिय व्हावे, असा सल्लाही मान्यवरांनी दिला.

पिंपरी चिंचवड, पुणे शहर मधील सर्वात मोठे रावण दहन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे, नागरिकांचे, पोलीस प्रशासनाचे, वाहतुक विभाग प्रशासन,अग्निशामक दल तसेच पालिका अधिकारी वर्ग यांचे आयोजक मार्फत आभार व्यक्त करण्यात आले. .शत्रुघ्न (बापू) काटे युथ फाउंडेशन आणि जयनाथ काटे सोशल फाउंडेशन यांच्या यशस्वी आयोजनामुळे हा सोहळा पिंपरी-चिंचवडमधील एक अविस्मरणीय आणि अर्थपूर्ण पर्व ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (अँकरिंग) चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल आणि आरजे अक्षय मोरे यांनी केले.

पिंपळे सौदागरमध्ये भव्य 70 फुटी ‘रावण दहन’!

viara vcc
viara vcc
Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"